भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

जळगाव जिल्हा महानगर सोशल मीडिया प्रमुख पदी भुषण जाधव यांची निवड !

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव जिल्हा महानगर सोशल मीडिया प्रमुख पदी भुषण मनोहर जाधव यांची निवड करण्यात आली आहे. या पूर्वी ते नमो ग्रुप फाऊंडेशनचे सोशल मीडिया चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष होते. या पदा वर असतांना कोरोनो संसर्गा च्या प्रतिबंधासाठी अल्सेनिक अल्बम ३० ह्या होमिपॅथी औषधीचे वाटप न्यू बी.जे मार्केट व सुप्रीम कॉलनी येथे केले. या विनामूल्य सेवेचा लाभ १५३० लोकांनी घेतला. तसेच रेशन दुकान दाराची अरेरावी व नेहमीच पुरवठा न करणे अश्या रेशन दुकानदारांची मनमानी थांबविण्यासाठी शासन दरबारी आवाज उठवून गरीब जनतेला नियमित या महामारी मध्ये धान्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याच प्रमाणे नेहमीच नागरिकांच्या तक्रारीची दाखल घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमी धडपड करत असतात. त्यांच्या ह्या धाडसी वृत्तीचा व ओढ असलेल्या सामाजिक कार्याचा विचार करून भाजपा युवा मोर्चाचे जळगाव जिल्हा महानगर जिल्हाध्यक्ष श्री.आनंद सपकाळे यांनी भुषण मनोहर जाधव यांची भाजपा युवा मोर्चा जळगाव जिल्हा महानगर सोशल मीडिया प्रमुख पदी निवड केली आहे. या निवडी बद्दल मा.मंत्री मा.आ.गिरीशभाऊ महाजन, जेष्ठ नेते मा.श्री.एकनाथरावजी खडसे, विभागीय संघटन मंत्री अॅड.किशोर काळकर, आ.राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जि.प.अध्यक्ष रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील, खा.उन्मेषदादा पाटील, खा.रक्षाताई खडसे, डॉ.राजेंद्र फडके, माजी आ.स्मिताताई वाघ, आ.चंदूभाई पटेल, माजी आ.गुरुमुख जगवाणी, सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ.राधेशाम चौधरी, महेश जोशी, नितीन इंगळे, वि.क्षे.प्रमुख दीपक साखरे, महापौर भारतीताई सोनवणे, माजी महापौर सिमा भोळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती अॅड.शुचिता हाडा, शोभा बारी, गटनेते भगत बालाणी यांनी अभिनंदन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!