भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात आज १८३ नविन कोरोना बाधित रुग्ण !

जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात १८३ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल १८३ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ३९ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल आज  जामनेर १२, चाळीसगाव ५, रावेर १२, भुसावळ ६, आणि मुक्ताईनगर १०, जळगाव ग्रामीण १२, अमळनरे ४, चोपडा २५, पाचोरा २०, धरणगाव १३, एरंडोल ३, पारोळा १३, बोदवळ ५, भळगाव ०, यावल ४  अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ८१८७ इतका झालेला आहे. यातील ५२५१ रूग्ण बरे झाले आहेत. आज १५ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ४१५ इतकी  तर उपचार घेत असलेले २५२१ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!