भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ४६७ कोरोना पॉझिटिव्ह; ७७१ रुग्ण बरे !

जळगाव प्रतिनिधी । जिल्हा प्रशासनाकडून आज प्राप्त झालेल्या अहवालामध्ये जिल्ह्यात आज ४६७ रूग्ण कोरोना बाधित निष्पन्न झाले असून ७७१ रूग्णांनी कोरोनावर मात केली असून घरी परतले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जळगाव शहर १८४, जळगाव ग्रामीण १८, रावेर ३०, भुसावळ ३०, अमळनेर ३९, चोपडा १८, पाचोरा १७, भडगाव २७, धरणगाव ५, यावल ७, एरंडोल ५, जामनेर ३३, पारोळा २५, चाळीसगाव ८, मुक्ताईनगर १०, बोदवड १० आणि इतर जिल्ह्यांतील २ असे एकुण ४६७ रूग्ण आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४६७४२ इतका झालेला आहे. यातील ३७५५२ रूग्ण बरे झाले आहेत. आज १० रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ११५५ इतकी  तर उपचार घेत असलेले ८०३५ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!