जळगाव जिल्ह्यात आज ६१६ नविन कोरोना बधितांची नोंद !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ६१६ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव आणि चोपडा तालुक्यात आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. आज सर्वाधीक १०१ रूग्ण हे जळगाव शहरातील आढळून आले आहेत. याच्या खालोखाल जळगाव ग्रामीण ३४, भुसावळ ३०, अमळनेर ४२, चोपडा ८६, पाचोरा ३६, भडगाव ३९, धरणगाव २८, यावल १४, एरंडोल ९, जामनेर ३६, रावेर ३०, पारोळा ५२, चाळीसगाव ६५, मुक्ताईनगर १, बोदवड ११ व दुसर्या जिल्ह्यांमधील २ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २१७१३ इतकी झालेली आहे. यातील १४९४५ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ४०२ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ५ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ७१८ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ६०५० रूग्णांवर उपचार सुरू आहेत.