भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात आज ६१७ रुग्ण कोरोना मुक्त; नवीन ६०४ बाधित !

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून जळगाव जिल्ह्यात आज ६०४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल ६०४ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ११६ रूग्ण हे जळगांव शहरातील आहेत. याच्या खालोखाल रावेर २२, एरंडोल २३, चाळीसगाव २०, भुसावळ ५४, आणि मुक्ताईनगर १४, जामनेर ३०, जळगाव ग्रामीण ६१, अमळनरे ६१, चोपडा ६३, पाचोरा ४३, धरणगाव ४१, पारोळा १८, बोदवळ २, भळगाव १९, यावल १३ , इतर ४ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.

जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा २३५२७ इतका झालेला आहे. यातील १६५९९ रूग्ण बरे झाले आहेत. आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ७५२ इतकी  तर उपचार घेत असलेले ६१७६ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!