जळगाव जिल्ह्यात आज ८०५ रुग्ण कोरोना मुक्त ; नविन २९८ पॉझिटिव्ह
जळगाव (प्रतिनिधी) आज सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज २९८ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले तर ८०५ रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे.
आलेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यातील आज जळगाव शहर ७६, जळगाव ग्रामीण ११, भुसावळ २२, अमळनेर ६, चोपडा २५ पाचोरा ७, भडगाव २, धरणगाव ७, यावल ८, एरंडोल १, जामनेर ४, रावेर ७, पारोळा ३, चाळीसगाव ७, मुक्ताईनगर ७, बोदवड ५ आणि इतर जिल्ह्यांतील ३ असे एकुण २९८ रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४९ हजार १०४ इतकी झाली आहे. आज ०७ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ११९८ रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेला असून ४३ हजार १४८ रुग्णांनी कोरोनावर मात करत घरी परतले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.