जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे मीटर वेगाने सुरु; आजही ३१९ रुग्णांची मोठी भर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात आजचा कोरोना रुग्णसंख्येचा आकडा धाकधूक वाढवणारा आहे रोजच्या तुलनेत झालेल्या कोरोना चाचण्यांमध्ये आज रुग्ण संख्येत मोठी भर पडली आहे. सोमवारी कोरोनाचे तब्बल 319 रुग्ण आढळले असून त्याबाबत प्रशासनाला सायंकाळी अहवाल प्राप्त झाला आहे
सोमवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 158, जळगाव ग्रामीण 06, भुसावळ 12, अमळनेर 20, चोपडा 18, पाचोरा 04, भडगाव 07, धरणगाव 04, यावल 04, एरंडोल 00, जामनेर 04, रावेर 00, पारोळा 01, चाळीसगाव 71, मुक्ताईनगर 07, बोदवड 00, अन्य जिल्हा 03 असे 319 रुग्ण आढळून आले आहे.
आतापर्यंत कोरोनामुळे 1375 रुग्णांचा मृत्यू ओढवला. जिल्ह्यात आतापर्यंत 58 हजार 854 नागरीकांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 56 हजार 178 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर सोमवारी एकाच दिवसात 80 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर गेल्या 24 तासात तब्बल चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.