जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा जोर कायम; आज ११९१ जणांना संसर्ग !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील कोरोनाचा विस्फोट सुरूच असून जिल्ह्यात कोरोनाचा वाढता कहर दिवसेंदिवस चिंतेचा विषय होत चालला आहे. आजही जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्या हजारी पार गेली आहे. जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्ह्यात आज ११९१ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले आहेत. तर दुसरीकडे ९२९ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून आज चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव शहर – १७१, जळगाव ग्रामीण-४७, भुसावळ- १९३, अमळनेर-१२०, चोपडा-२३३, पाचोरा-४१, भडगाव-४८, धरणगाव-४८, यावल-२४, एरंडोल-६५, जामनेर-४६, रावेर-२६, पारोळा-२०, चाळीसगाव-५६, मुक्ताईनगर-३१, बोदवड-२०, इतर जिल्ह्यातील-०२ असे एकुण ११९१ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत रुग्णांची एकुण संख्या ८७ हजार ८७९ पर्यंत पोहचली असून ७४ हजार ५९४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार आतापर्यंत १६११ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. तर ११६७४ रुग्ण सध्या उपचार घेताय.