जळगाव जिल्ह्यात धोका वाढतोय आज ४१८ नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून जळगाव जिल्ह्यात आज ४१८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात सर्वाधिक १२१ रुग्ण जळगाव शहरातील आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल ४१८ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १२१ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल आज जामनेर ३८, चाळीसगाव ४४, रावेर ३३, भुसावळ ६, आणि मुक्ताईनगर २, जळगाव ग्रामीण १२, अमळनरे १५, चोपडा ४५, पाचोरा १८, धरणगाव २५, एरंडोल १०, पारोळा ५, बोदवळ ३, भळगाव २, यावल १६ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ८६०५ इतका झालेला आहे. यातील ५४७० रूग्ण बरे झाले आहेत. आज १२ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या ४२७ इतकी तर उपचार घेत असलेले २७०८ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.