जळगाव जिल्ह्यात ७४२ कोरोना पॉझिटिव्ह; जळगावात संसर्ग कायम !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ७४२ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात सर्वाधित जळगाव शहरातील आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जिल्ह्यात सर्वाधीक १९६ रूग्ण हे जळगाव शहरातील असून आढळून आले असून याच्या खालोखाल ११५ रूग्ण हे पारोळ्याचे आहेत. उर्वरित तालुक्यांचा विचार केला असता, रावेर २३, जळगाव ग्रामीण १०, जामनेर २५, पाचोरा १०, भुसावळ ६०, अमळनेर ५६, चोपडा ५८, भडगाव २, धरणगाव ४३, यावल २१, एरंडोल ७, चाळीसगाव ६४, मुक्ताईनगर १८, बोदवड २४, अन्य जिल्हा १० असे रूग्ण बाधित आढळून आले आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४३३०१ इतका झालेला आहे. यातील ३२३३६ रूग्ण बरे झाले आहेत. आज १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या १०८० इतकी तर उपचार घेत असलेले ९८८५ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.