जळगाव जिल्ह्यातील दोन आमदाराना कोरोनाची लागण !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यांनी सोशल मीडियातून यासंदर्भात माहिती दिली आहे.
आज चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरआप्पा पाटील दोघानी स्वत: आपल्या फेसबुक पेजवरून याबाबतची माहिती दिली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनीही तपासणी करून घेत स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन केले असून मंगेश चव्हाण यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वत:ला होम क्वॉरंटाईन करून होण्याचा निर्णय घेतला आहे. तर आमदार किशोरआप्पा पाटील काल रात्री ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला, त्यांनी आपल्यावर उपचार सुरू असून प्रकृती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. आपल्या संपर्कात गेल्या काही दिवसात जे आले असतील त्यांनी चाचणी करून काळजी घेण्याचे आवाहन यांनी देखील केले आहे.