जळगावं जिल्ह्यात आज ३४५ नविन कोरोना बाधित रुग्णांची नोंद !
जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात ३४५ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल ३४५ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ७७ रूग्ण हे भडगाव तालुक्यातील आहेत. याच्या खालोखाल जळगाव शहरातील ५०, रावेर ७, एरंडोल ०, चाळीसगाव १४, भुसावळ ९, आणि मुक्ताईनगर १४, जामनेर २९, जळगाव ग्रामीण ११, अमळनरे ३१, चोपडा २२, पाचोरा ४४, धरणगाव १७, पारोळा १५, बोदवळ ०, यावल ३, इतर २ अशे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा १२३८१ इतका झालेला आहे. यातील ८६९३ रूग्ण बरे झाले आहेत. आज १५ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ५६४ इतकी तर उपचार घेत असलेले ३१२४ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.