क्राईमजळगाव

जळगावात रेल्वे तीकिटांची बेकायदेशीर विक्री : टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल दुकान मालकास अटक !

मंडे टू मंडे वृत्तसंकलंन।

जळगाव प्रतिनिधी : येथील खान्देश कॉम्लेक्स रेल्वेतील आरक्षित टीकिटांचा काळाबाजार करत रेल्वे तिकिट विक्री करण्याचा परवाना नसतांना बेकायदेशीर विक्री करणाऱ्या महालक्ष्मी टुर्स ॲण्ड ट्रॅव्हल दुकानावर बुधवारी रेल्वे सुरक्षा बलासह भरारी पथकाने छापा टाकला. छापा टाकून ६ हजार ७३३ रूपयांचे तिकिटे जप्त करून महालक्ष्मी टूर्स अ‍ॅण्ड ट्रव्हलचे मालक संजय मोतीराम चौधरी वय 53 यांना अटक केली आहे. संशयित आरोपीला आज रेल्वेच्या न्यायालयात हजर केले असता एका दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सदरील कारवाई भुसावळच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख सीनियर डीसीएम तथा आरपीएफ विभागाचे प्रमुख सीनियर डीएससी यांच्या मार्गदर्शनानुसार भुसावळच्या रेल्वे वाणिज्य विभागाचे एटीएस पथकातील मुख्य तिकिट निरिक्षक हेमंत सावकारे, मुख्य तिकिट निरिक्षक ए. एस. राजपूत, उपमुख्य तिकिट निरिक्षक प्रशांत ठाकूर व जळगावचे रेल्वे सुरक्षा बलाचे पोलीस निरिक्षक सी एस पटेल यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!