जळगावात वृद्धांची गळफास घेऊन आत्महत्या
जळगाव (प्रतिनिधी)। शहरात सोमवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास गवळी वाडा येथील ६० वर्षीय वृद्धाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर असे की, उत्तम तानकू हटकर, वय-६० राहणार गवळी वाडा यांनी घरात कोणीही नसतांना दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास मुलगा जिभाऊ उत्तम हटकर घरी आल्यावर यांच्या लक्षात आले. तातडीने जिल्हा शासकिय वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी डॉ. विसपुते यांनी त्यांना मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.