भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जामनेर

जामनेर तालुक्यातील अवैध धंदे बंद करा– राष्ट्रवादी काँग्रेसचे निवेदन

जामनेर (प्रतिनिधी)। तालुक्यातील सामरोद येथे उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून अवैध धंदेवाल्यांवर कारवाई करण्यात आली दरम्यान या कारवाईची तक्रार का केली म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्याने पक्षातर्फे याबाबतचे निवेदन जामनेर पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.

संबंधित बातम्या- फैजपुरात मटका (सट्टा) व्यवसाय जोमात; पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह…..!

निवेदनात म्हटल्यानुसार, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने अवैध धंदेवाल्यांविरूद्ध मोहीम सुरु केली आहे. त्याचाच भाग म्हणून सामरोद येथे कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार कारवाई झाली. मात्र आता तेथील काही अवैध व्यावसायिकांनी कार्यकर्त्यांना धमकावणे सुरु केले असल्याने जामनेर तालुक्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालावा अशी मागणी करण्यात येत आहे. निवेदनावर तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, डॉ. प्रशांत पाटील, नरेंद्र जंजाळ, जीनेश पाटील, अनिल कुमार बोहरा, विशाल एस. पाटील, विनोद माळी आदींच्या सह्या आहेत.

संबंधित बातम्या- पोलीस अधीक्षकांची “अवैध धंदे बंद” ची घोषणा हवेतच विरली… फैजपूर मध्ये ” मटकाकिंग” चे जाळे भक्कम, अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ की प्रेमपूर्ण अर्थकारण ?

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!