भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावभुसावळराजकीय

जिल्हा परिषद बदल्यान मध्ये लाखोंचा घोटाळा- लेडी सिंघम पल्लवी सावकारे

जळगाव (विशेष प्रतिनिधी)। जिल्हा परिषदेच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला असून यात लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असल्याचा भाजपच्या लेडी सिंघम जि. सदस्या पल्लवी सावकारे यांच्या आरोपाने खळबळ उडाली आहे.

या बाबत माहिती अशी की, जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर घोटाळा झालेला आहे. या बदली प्रक्रियेत ज्या लोकांनी आर्थिक व्यवहार केले आहेत त्यांचीच नावे स्क्रीनवर दिसली. इतर इच्छुक कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याच्या धमक्या देऊन बोळवण करण्यात आली असून काही कर्मचाऱ्यांनी त्यांचा कार्यकाळ संपलेला असूनही खाजगी डॉक्टरांकडून बनावट वैदकीय प्रमाणपत्रे सादर करून शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्यांच्या बदल्या थांबवल्या आहेत. खाजगी डॉक्टरांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्रे बदली प्रक्रियेस कशी चालतील. शासनाच्या कोणत्या जी आर मध्ये याचा उल्लेख आहे याची माहिती मला मिळावी, तसेच दरवर्षी अपंग प्रमाणपत्रामध्ये घोळ होतो. अपंग प्रमाणपत्रामध्ये 40% पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास शासकीय बदलीस पात्र ठरतो. यावर्षी देखील अपंग प्रमाणपत्राच्या छायांकित प्रति पाहून वैध असल्याची खातरजमा न करता आर्थिक हितसंबंध जोपासून बदल्या झालेल्या आहेत. काही कर्मचाऱ्यांनी बनावट अपंग प्रमाणपत्रे जोडलेली आहेत. यासाठी सर्व अपंग प्रमाणपत्रे जिल्हा चिकित्सक कडून तपासण्यात यावीत

या बदल्यांच्या सर्व कागदपत्रांच्या छायांकित प्रतीची मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मागणी केली आहे. या प्रक्रियेत अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय न मिळाल्यास संबंधित मंत्रीमहोदय आणि विरोधी पक्ष नेते यांच्याकडे याबाबत कारवाईची मागणी करणार असल्याचा  इशारा पल्लवी सावकारे यांनी निवेदनात दिला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!