भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

जिल्हाधिकारी यांच्या आदेशाची पायमल्ली; २३ दुकानदारांना यावल पो.स्टे.मधे समज, आज सकाळी यावल शहरात मोठी खळबळ !

सुरेश पाटील
यावल (प्रतिनिधी)। जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशाची पायमल्ली करीत यावल शहरातील व्यापाऱ्यांनी आज दिनांक 6 ऑगस्ट 2020 गुरुवार रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास आपली दुकाने सुरू केल्याने यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आपल्या पोलीस पथकाच्या माध्यमातून यावल शहरातील 23 दुकानदारांना यावल पोस्टमध्ये आणले असता व्यापारीवर्गाच्या विनंतीनुसार यावल पोलिसांनी दुकानदारांना समज देऊन सोडून दिले. यामुळे संपूर्ण यावल शहरात आज सकाळी एकच खळबळ उडाली.

यावल शहरासह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशान्वये व्यापाऱ्यांनी, दुकानदारांनी आप आपली दुकाने उघडे करण्याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतची निश्चित केलेली आहे. आणि याबाबत पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वतः पोलीस व्हॅन माध्यमातून संपूर्ण यावल शहरात गस्त घालून लाऊड स्पीकर वरून सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना जाहिर सूचना दिलेल्या होत्या. तरी सुद्धा यावल शहरातील व्यापाऱ्यांनी आदेशाचे पालन न करता नियमाचे उल्लंघन करीत यावल शहरातील व्यापारी सकाळी 7 वाजता आपली दुकाने सुरू करून रात्री उशिरापर्यंत आप आपले व्यवहार करीत असल्याची माहिती यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना मिळाल्याने तसेच प्रत्यक्ष दिसून आल्याने त्यांनी आज दिनांक 6 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 7 वाजेच्या सुमारास यावल शहरात मुख्य रस्त्यावर गस्त घालून प्रत्यक्ष पाहणी करीत यावल शहरातील एकूण 23 दुकानदारांनी मुख्य रस्त्यावर आपापली दुकाने उघडी केली असल्याचे दिसून आल्याने त्या दुकानदारांना ताब्यात घेऊन यावल पोलीस स्टेशनला आणले असता काही दुकानदारांनी विनंती केली की आम्हाला दुकान उघडण्याची निश्चित वेळ माहिती नसल्याने आमच्यावर कार्यवाही करू नका अशी विनंती केल्याने यावल पोलिसांनी त्यांना समज देऊन सोडून दिले. यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या बेधडक कार्यवाहीमुळे मात्र संपूर्ण यावल शहरात एकच खळबळ उडाली. यामुळे आता यावल शहरात सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेच्या दरम्यान दुकाने सुरू राहतील.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!