भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल :तहसीलदार वैशाली हिंगेच्या विरोधातील तक्रार आयुक्तांकडे

जळगाव(प्रतिनिधी)– लोकसभा निवडणुकीपासून कोविडच्या उपाययोजनांत हलगर्जी केल्यामुळे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेल्या जळगावच्या तहसीलदार श्रीमती वैशाली हिंगे यांना निलंबित करण्यात यावे अशी तक्रार जनसंग्राम संघटनेचे संस्थापक विवेक ठाकरे यांनी केली होती त्याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेत ही तक्रार कार्यवाहीसाठी विभागीय आयुक्त यांना पाठवली आहे.

२८ एप्रिल रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी विभागीय आयुक्त यांच्या निर्देशावरून जळगावच्या तहसीलदार श्रीमती वैशाली हिंगे यांना विविध ९ गंभिर कारणांवरून सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा आदेश काढला होता.शेतकरी अनुदान वाटपात दिरंगाई करणे.लोकसभा निवडणुकीवेळी मतदान चिठ्ठ्या वाटपाचे नेमून दिलेले काम धिम्या गतीने केल्याने मतदान टक्केवारीवर विपरीत परिणाम झाला.विधानसभा निवडणुकीत मागणीनुसार खर्चाची वेळेवर बिले सादर न केल्याने अनुदानाच्या ३२ टक्के रक्कम शासनास परत गेली.ऑक्टोबर व नोव्हेंबर मधील वादळाच्या नुकसानभरपाई कामकाजात अत्यंत बेजबाबदारपणा केला व दुर्लक्ष केले.तालुक्याची शासकीय वसुली ७९.०५ एवढीच केल्याने जिल्ह्याच्या शासकीय वसुलीवर परिणाम झाला.पुरवठा विषयक कामकाजात असंवेदनशील असणे.जातीचे दाखले देतांनाचा भोंगळ कारभार व त्यामुळे तलाठी भरतीत पात्र उमेदवार शासकीय सेवेच्या लाभापासून वंचित राहणे.वरिष्ठ कार्यालयास सादर करावयाच्या माहित्या वेळेत विहित मुदतीत प्राप्त न होणे व खातरजमा न करता चुकीच्या सादर करणे.जिल्ह्यात कोविड-१९ च्या अनुषंगाने पीडीएस धान्य वाटपात सुदधा आवश्यक लक्ष नसणे या प्रमुख
कारणांमुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील ३ चा भंग केल्याने श्रीमती हिंगे यांच्यावर कारवाई करून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.या गंभीर प्रकरणाची चौकशी सुरू असतांना व तहसीलदार हिंगे यांना निलंबित करण्याची महसूल विभागाची कारवाई प्रस्तावित असतांना त्या पुन्हा २ जून रोजी जळगाव तहसीलदार म्हणून रुजू झाल्या आहेत.तसेच २०१५ मधील भुसावळ तहसीलदार म्हणून त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी होऊन निलंबनाच्या कारवाईच्या प्रस्तावाची व आता जळगाव तहसीलदार म्हणून सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा गंभीर प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्यात यावी व त्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी विवेक ठाकरे यांनी २३ जून रोजी केली होती.या तक्रारीची दखल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी घेत नाशिक विभागीय आयुक्तांना तक्रार पाठवत आयुक्त स्तरावरून पुढील कार्यवाही व्हावी म्हणून विनंती केली आहे.

👇🏻

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!