जिल्ह्यात आज ९१४ रुग्णांची कोरोनावर मात; २७३ कोरोना पॉझिटिव्ह
जळगाव (प्रतिनिधी)। आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ९१४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे तर २७३ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जळगाव शहर ९०, जळगाव ग्रामीण १३, भुसावळ ६५, अमळनेर ४, चोपडा १०, पाचोरा ६, भडगाव ७, धरणगाव ७, यावल ३, एरंडोल ११, जामनेर १९, रावेर ८, पारोळा ६, चाळीसगाव १६, मुक्ताईनगर ३, बोदवड १ आणि इतर जिल्ह्यांमधील ४ असे एकुण २७३ रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४८१८० इतका झालेला आहे. यातील ४०५४५ रूग्ण बरे झाले आहेत. आज ९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या ११८४ इतकी तर उपचार घेत असलेले ६४५१ असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.