डिंगम्बर महाराज चिनावल कर पायी दिंडीचे पंढरपूर कडे झाले प्रस्थान: आईसाहेब मुक्ताई सोहळयात होणार सहभागी !
फैजपूर ता.यावल । दरवर्षी खानापूर चिनावल ते पंढरपूर डिंगम्बर महाराज चिनावलकर पायी दिंडी जात असते हा दिंडी सोहळा वै डिंगम्बर महाराज चिनावल कर यांनी सुरू केला असून पुढे वै विठ्ठल महाराज हंबर्डीकर व वै अरुण महाराज बोरखेडेकर यांनी अनेक वर्षे सेवा केली. आता ह भ प दुर्गा दास महाराज नेहते खिर्डीकर प्रमुख म्हणून दिंडी चालक सेवेत आहेत. सोमवारी खानापूर येथून दिंडीचे प्रस्थनं ठेवण्यांत आले यावेळी दिंडी प्रमुख ह भ प दुर्गदास महाराज नेहते, विणेकरी ह भ प भगवन्त महाराज चौधरी खानापूर व भास्कर बोन्डे, पांडुरंग पाटील, हेमा बोन्डे कळमोदा, दिगंबर महाराज मठाचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे, भूषण नारखेडे, राहुल साळी, उपाध्यक्ष घनश्याम पाटील, सचिव विठ्ठल सर भंगाळे, किशोर बोरोले, लीलाधर कोल्हे, बोरखेडेकर व हंबर्डीकर भजनी मंडळ उपस्थित होते. हरीश अत्तरदे, कमलाकर चौधरी, सांगवीकर भजनी मंडळ उपस्थित होते सर्व दिंडीचे वतीने संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे हे आदिशक्ती मुक्ताईचे सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूर येथे जाणार आहेत.