भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगाव

तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। तालुक्यातील शिरसोली येथील २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सुकलाल मराठे असे गळफास घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. गळफास घेण्याचे कारण मात्र गुलदस्त्यात आहे.

सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील शिरसोली प्र. न. इंदिरा नगर येथील रहिवासी सुकलाल भानुदास मराठे यांचा मुलगा सुभाष सुकलाल मराठे (वय २५) हा आज गुरुवारी दि. २४ रोजी ४.१५ वाजेच्या सुमारास घरी एकटा होता. यावेळी पत्राच्या राहत्या घरात छताच्या कडीला साडी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हि घटना सुभाषची आई केवळाबाई मराठेंच्या लक्षात आली. त्यांनी लागलीच आजूबाजूच्या लोकांना बोलावून शिरसोली येथील पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांना कळविले. त्यांनी घटनास्थळी येऊन सुभाषला खाली उतरून जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणले असता त्याला वैद्यकीय अधिकार्‍यांनी मृत घोषित केले. सुभाष हा मिस्त्री काम करायचा. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंदणी करण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!