दत्त ठिंबक फैजपूर यांच्या कडून डयुरा ऑक्सिजन सिलेंडर साठी 15 हजारांची मदत…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
रावेर,ता.रावेर (प्रतिनिधी)।
ग्रामीण रुग्णालय रावेर येथील कोविड रुग्णांसाठी, ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर उभारणीसाठी दत्त ठिंबक फैजपूर चे संचालक युगंधर जितेंद्र पवार यांच्या कडून कै, जितेंद्र पवार सर यांच्या स्मरणार्थ आर्थिक मदत
स्वेच्छेने रु.15000-/ रुपये तहसीलदार, रावेर सौ उषा राणी देवगुणे यांच्याकडे सुपूर्त केली,या वेळी रावेर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष विलास ताठे, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघाचे किरण पाटील, कार्याध्यक्ष पत्रकार संघ म.रा.योगेश सैतवाल, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य महेंद्र पाटील गौरखेडा आदी उपस्थित होते
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
रावेर ग्रामीण रूग्णालयात डयुरा ऑक्सिजन सिलेंडर उभारण्यासाठी लोकसहभागाचे स्थानिक लोक प्रतिनिधी, प्रशासनाकडून मदतीसाठी जाहीर आवाहन करण्यात आले होते, त्यास समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था, संघटना यांनी उत्तम प्रतिसाद देत असून रावेर-यावल तालुक्यातील कै जितेंद्र पवार सर हे सामाजिक बांधिलकी, समाज प्रती संवेदनशीलता , कर्तव्यदक्ष सामाजिक कार्यकर्ते म्हणून सदैव प्रयत्नशील होते,पण अचानक त्यांच्या वर दुर्दैवाने काळाने झडप घातली, पण त्यांचे सुपुत्र युगंधर जितेंद्र पवार हे तेवढ्याचं आत्मयीतेने कै जितेंद्र पवार सर यांच्या विचारांचा, कार्याचा वारसा पुढे नेत आहेत, आणि समाजाचं ऋण फेडण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील आहेत.
आज सर्व देशभर कोरोनाचा कहर वाढतोय सर्व सामान्य कोरोना बांधित रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची गरज अत्यावश्यक झाली आहे म्हणून सदर जाहीर मदतीच्या आवाहनाला दत्त ठिंबक फैजपूर यांनी एकूण 15000/- रुपयांची अमुल्य देणगी देवून समाजातील इतर सर्वांसमोर एक उत्तम विधायक कार्याचे उदाहरण ठेवले आहे, यामुळे युगंधर जितेंद्र पवार यांचें सर्व समाजातून कौतुक होत आहे.