दलित आदिवासी कुटूंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा– वंचित बहुजन चा फैजपुर प्रांत कार्यालयास घेराव..
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। आजी माजी आमदारांचे गाव असलेल्या खिरोदा तालुका रावेर येथे मागील 60 ते 70 वर्षापासून दलित आदिवासी समाजातील अनेक कुटुंब सरकारी जागेवर झोपडीवजा घरात राहत असलेल्या दलित आदिवासी कुटुंबातील महिलांनी जागा नावे करून घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी ग्रामपंचायतीकडे व स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी तगादा लावला असता त्यांनी केवळ टाळाटाळ केल्याचे दिसून आले ,वंचित बहुजन महिला आघाडीच्या वतीने महिलांनी फैजपूर उपविभागीय कार्यालय फैजपूर येथे आपले म्हणणे मांडण्यासाठी अतिक्रमित जागा नावे करून घरकुल योजनेचा लाभ मिळावा यासाठी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांच्याकडे आपले म्हणणे मांडले.
याविषयी लवकरात लवकर योग्य ती शासकीय कार्यवाही पूर्ण करुन प्रलंबित प्रकरण मार्गी लावून न्याय मिळवून देऊ असे उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने आश्वासन देण्यात आले. सदर प्रसंगी शमिभा पाटील महा प्रदेश सदस्य वंचित बहूजन आघाडी तसेच महिला आघाडी पदाधिकारी सुलोचनाबाई भालेराव,नजमा उस्मान तडवी,
शबनम बाई इस्माईल तडवी, हलीमा सुपडू तडवी वंचित बहुजन युवा आघाडी चे अध्यक्ष अविनाश वाघ,राजकुमार ससाणे, प्रदिप ससाणे, तसेच पदाधिकारी,कार्यकर्ते व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन आंदोलन यशस्वी केले