दिवाळीत नियोजन नसल्याने रेशनवरील साखरेचा गोडवा हिरावला
कोरपावली ता.यावल (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील ग्रामीण भागात सणासुदीच्या काळात म्हणजे ऐन दिवाळी सारख्या सणाला गरीब व गरजू कुटुंबाना साखर पोहचली नाही,अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबाना नियमित साखर प्राप्त असताना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ग्रामीण भागातील आदिवासी नागरिकांची तोंडाची साखर पळविली गेली आहे.
दिवाळीचा सण लक्ष्यात घेता संबधित पुरवठा अधिकाऱ्यानी शासनाकडे साखरेची मागणी केली होती परंतु शासनाकडून सखार येण्यास विलंब झाल्याने साखर उपलब्ध झाल्यास तात्काळ संबधीत रेशन वितरण करणाऱ्या मालकांना सुपूर्द करून वाटप करण्याचे आदेश देण्यात येईल असे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले, स्वस्त धान्य दुकानात अनेक महिन्यापासून संबधीत मालाची पावती ग्राहकांना मिळत नसल्याने कुणाला किती व काय माल देण्यात आला याचे काहीही कुणाला गणित लागत नसून संबधित पुरवठा आधीकारी वर्गाला या गोष्टींची जाणीव असूनही दुर्लक्ष का करीत असतात, या बाबत आच्चर्य व्यक्त केले जात आहे,