देशभरात समूह संसर्गास सुरवात- इंडिय मेडिकल असोसिएशन (IMA)
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। देशभरात कोरोनाचे थैमान सुरू असतांना देशात १० लाखांऊन अधिक रुग्ण बाधित आढळून आल्यामुळे दिवसागणिक रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने देशात समूह संसर्गाला सुरवात झाली असल्याचा इशारा इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) दिला आहे
देशभर कोरोना व्हायरसचा प्रभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे एवढंच काय तर ग्रामीण भागात खेड्या-पाड्यातही कोरोनाचा प्रभाव दिसून येत आहे दिवसाला देशात ३०हजारांपेक्षा जास्त रुग्ण बाधित आढळून येत आहे ही स्थिती गंभीर असून देशभरात कोरोनाचा समूह संसर्ग सुरू झालं असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. व्ही के मोंगा यांनी सांगितले आहे. एकंदरीत परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून ग्रामीण भागातील वाढता संसर्ग बघता यावर नियंत्रण मिळवणे कठीण असल्याचे म्हटले आहे.