भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

धक्कादायक! दारु ऐवजी सॅनिटायझर पिणाऱ्या सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू

नागपुर । दोन महिन्यांपूर्वी साताऱ्यात दारु न मिळाल्याने दारुऐवजी सॅनिटायझरचे सेवन केल्याने दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना पुन्हा अशीच घटना नागपूरमध्ये घडली आहे. दारुऐवजी सॅनिटाझर प्यायल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. गौतम गौस्वामी (४५) असे या व्यक्तीचे नाव असून गौस्वामी हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून काम करत होते. त्यांना दारुचे व्यसन होते. मात्र, त्यांना दारु न मिळाल्याने त्यांनी सॅनिटायझरचे सेवन केले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आहे.

नेमके काय घडले?

नागपूरच्या कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील गंगाबाई घाट परिसरात गौतम गौस्वामी राहत होते. त्यांना दारुचे व्यसन होते. मात्र, सध्या दुकान बंद असल्याने त्यांनी सॅनिटायझरचे सेवन केले. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक प्रकाराने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!