भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्याराष्ट्रीय

धक्कादायक! परीक्षा देऊन आलेल्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

बंगळुरू : देशभरात कोरोना व्हायरसचं थैमान असताना आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लॉकडाऊनमुळे स्थगित केलेल्या (Secondary School Leaving Certificate ) SSLC च्या परीक्षा कर्नाटक बोर्डानं घेतल्यानंतर परीक्षा दिलेल्या 32 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 25 जून पासून ही परीक्षा सुरू झाली होती. साधारण 8 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 3 जुलैला परीक्षा देऊन आलेल्या 32 विद्यार्थ्यांची चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

गेल्या आठवड्यात, हसनमधील दहावीच्या विद्यार्थ्याने कोरोनाची चाचणी केल्यानंतर ती पॉझिटिव्ह आली. त्याने 25 जूनला परीक्षा दिली होती. 27 मार्च ते 9 एप्रिलदरम्यान आयोजित केलेल्या SSLC परीक्षा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे स्थगित करण्यात आल्या होत्या. या परीक्षा शाळा सॅनिटाइझ करून पुन्हा 25 जून ते 3 जुलै या कालावधीत पार पडत आहेत. परीक्षा गृहात विद्यार्थ्यांना हँड सॅनिटायझर दिले जातील आणि रोज वर्ग सॅनिटाइझ करण्यात येतील असं सरकारकडून सांगण्यात आल्यानंतरही 32 विद्यार्थ्यांचे परीक्षा देऊन आल्यावर कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. या घटनेमुळे कर्नाटकात मोठी खळबळ उडाली आहे. देशात सध्या एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 6 लाख 48 हजार 315 झाली आहे. तर, 24 तासांत 442 जणांचा मृत्यू झाला. यासह मृतांचा एकूण आकडा 18 हजार 655 झाला आहे. देशात सध्या 2 लाख 35 हजार 433 सक्रीय रुग्ण आहेत. तर, 3 लाख 94 हजार 227 रुग्ण निरोगी झाले आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!