भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

धक्कादायक! शासकीय कर्तव्यनिष्ठ खऱ्या कोरोना योद्धाचा (पोलीस निरीक्षक धनवडे) रिपोर्ट पॉझिटिव्ह !

यावल (सुरेश पाटील)। येथील पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांचा आज दि. 9 रविवार रोजी सकाळी अँटीजेन टेस्ट रिपोर्ट/ कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याने संपूर्ण पोलिस यंत्रणेत एकच खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने भुसावळ येथील रेल्वे हॉस्पिटल मध्ये पुढील औषधोपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सुद्धा समजले.

कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी आपल्या पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात तथा ग्रामीण भागात व यावल शहरात स्वतः व आपल्या यावल पोलीस कर्मचाऱ्यांच्या तसेच गांवागांवातील पोलीस पाटील व इतर सामाजिक संघटनांच्या माध्यमातून रात्रंदिवस गस्त घालून तसेच नागरिकांच्या संपर्कात राहून ठिक- ठिकाणी बैठका, सभा घेऊन पोलीस व्हॅन माध्यमातून लाऊड स्पीकर वरून महत्वाच्या व कायदेशीर सूचना देऊन वेळेपर्यंत प्रसंगी कटू निर्णय घेऊन कोरोनाविषाणू बाबत जनजागृती करून कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून नागरिकांमध्ये मोठी जनजागृती केली त्याचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम संपूर्ण यावल शहरात प्रत्यक्ष दिसून येत आहे. त्यांनी रात्रंदिवस केलेल्या कामाची दखल जनतेने घेतली असून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे खरे कोरोना योद्धा म्हणून सक्रिय व कर्तव्यनिष्ठ होते आणि हे कार्य करताना त्यांना कोरोना विषाणूची बाधा झाली असल्याची जाणीव समयसूचकता मिळताच त्यांनी आज स्वतःहून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात जाऊन यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.बी.बी.बारेला यांच्याशी संपर्क साधून कोरोना पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तपासणीसाठी 10 ते 15 मिनिटाच्या आत रिपोर्ट मिळणाऱ्या अँटीजेन टेस्ट करुन घेतली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी यावल ग्रामीण रुग्णालयातील औषध निर्माण अधिकारी सूर्यकांत पाटील, प्रयोगशाळा तंत्रज्ञ नानासाहेब घोडके यांनी केली, पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या पत्नी तसेच 1 लहान मुलगा आणि 1 लहान मुलगी यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. पोलीस निरीक्षक अरुण धनवडे हे आपल्या शासकीय दैनंदिन कामकाजात कोण कोणत्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आले आहे किंवा नाही याची तपासणी सुद्धा वैद्यकीय पथकाकडून पोलीस कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार असल्याचे समजले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!