धक्कादायक; सावद्यात कोरोनाचा विस्फोट ४ महिला व ३ पुरुषांसह ७ रुग्ण बाधित !
सावदा ता.रावेर (प्रतिनिधी): तालुक्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सावदा शहरातही आता पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे वास्तव आहे. शहरातील तपासणीसाठी देण्यात आलेले २८ अहवाल मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त झाले असुन अहवालानुसार शहरातील तब्बल ७ रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले असुन बाकी २१ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. बाधित रुग्णांमध्ये ४ महिला व ३ पुरुषांचा समावेश असुन त्यांतील एक ४० वर्षीय महिला व एक २० वर्षीय पुरुष मुलगा धान्य मार्केट परिसरातील रहिवासी तर जगमाता परिसरातील दोन ३८ वर्षीय व एक ३४ वर्षीय महिला तसेच सोमवरगिरी मढी परिसरातील ५१ वर्षीय पुरुष व गांधी चौक परिसरातील २२ वर्षीय पुरुष मुलगा यांचा समावेश असुन दिवसागणिक रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा परिसरातील चिंतेच्या वातावरणात मोठी भर पडली असुन एकूण तब्बल सात रुग्ण बाधित आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. तर बाधित रुग्णांचा रहिवासी असलेला परिसर प्रशासनाकडून आधीच सील करण्यात आलेला असून सदरील वृत्तास स्थानिक नगरपालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ५८ झाली असुन त्यात ९ मयत तर १८ उपचार घेत आहेत व बाकी सर्व कोरोनाला हरवत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे