धक्कादायक; सावद्यात डॉक्टर सह पत्नीस कोरोनाची बाधा !
सावदा (प्रतिनिधी)। शहरात सुरवातीला कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात आढळून आला होता परंतु नंतर शहरातील बाधितांची संख्या बऱ्या पैकी कमी झाली होती त्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला होता, मात्र काल रात्री आलेल्या खाजगी लॅब मधील कोरोना तपासणी अहवालात एका डॉक्टर सह पत्नीस कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असून सदरील वृत्ताने परिसरात खळबळ उडाली आहे.
शहरातील आलेल्या अहवालांमध्ये २ अहवाल बाधित आढळून आले आहेत त्यामध्ये एक ३२ वर्षीय तरुण डॉक्टर सह २८ वर्षीय पत्नीचा समावेश असुन रावसाहेब प्रेमचंद नगर परिसरातील रहिवासी आहेत. सदरील वृत्ताने परिसराची चिंता वाढली आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या ६१ झाली असुन त्यात ९ मयत आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.