धक्कादायक; सावद्यातील एका कोरोना बाधित रुग्णांचे निधन !
सावदा ता.रावेर। शहरातील संशयित म्हणुन जळगाव येथे उपचारासाठी दाखल केलेल्या रुग्णांचा तपासणी अहवाल 21 तारखेला प्राप्त झाला होता. आलेल्या कोरोना तपासणी अहवालात जगमाता परीसरातील रुग्ण बाधित आढळुन आल्याचे निष्पन्न झाले होते. आज सकाळी आलेल्या वृत्ता नुसार सदरील 56 वर्षीय पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाकडून कळवण्यात आले आहे. सदरील घटना परिसरासाठी चिंताजनक आहे. परीसरातील या घटनेने शहरात चिंता पसरली असुन सदरील वृत्तास नगरपालिका मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोरोना बाधित रुग्ण संख्या 39 झाली असुन त्यात 7 मयत, 3 उपचार घेत आहे व बाकी सर्व कोरोनाला मात देत घरी परतले आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.