धक्कादायक:जिल्ह्यात आज आणखी २१७ कोरोना बाधित तर जळगावात सर्वाधिक ९२ !
जळगाव (प्रतिनिधी) । आज सायंकाळी कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल प्राप्त झाले असुन आलेल्या अहवालात जिल्ह्यात २१७ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याचे दिसुन येत आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या प्रेस नोट नुसार जिल्ह्यात आज तब्बल २१७ रूग्ण बाधित आढळून आले आहेत. यात सर्वाधीक ९२ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत. याच्या खालोखाल पारोळा २६, चाळीसगाव १८, रावेर १५, बोदवड १५, जळगाव ग्रामीण व चोपडा- प्रत्येकी ११, भुसावळ ६, भडगाव ५, धरणगाव २, यावल ६, एरंडोल ३, जामनेर ५ ,अमळनेर १ व अन्य जिल्ह्यातील१ अशी रूग्णसंख्या आहे.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४८०३ इतका झालेला आहे. यातील २८२८ रूग्ण बरे झाले आहेत. तर सध्या ११९६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आज ११ मृत्यू झाले असून आजवरील मृतांची संख्या २९३ इतकी असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.