न,पा, दवाखान्यात अत्याधुनिक सेवा-सुविधा उपलब्ध व्हाव्यात– प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना निवेदन.
फैजपूर (प्रतिनिधी)। येथील नगरपरिषद दवाखान्यात डॉक्टर नाहीत,महिलांचे डिलेवरी करीता महिला डॉक्टर किंवा महिला नर्स नाहीत, अत्याधुनिक सोयी सुविधा नाहीत.त्या मुळे फैजपूर येथील गोरगरीब, दलीत, आदिवासी, अल्पसंख्याक, सर्व साधारण जनता वैद्यकीय सेवेपासुन त्रस्त झालेली आहे, खाजगी दवाखान्याचे अवास्तव चार्ज असतात सर्व सामान्य जनतेला परवडणारे नसतात. अत्याधुनीक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने गंभीर तसे मोठ्या आजारी रूग्णांना भुसावळ, जळगाव सारख्या शहरात धाव घ्यावी लागते, फैजपूर येथील जनता बहुधा मोल मजुरी करणारे, मजुर ,शेतमजूर, असल्याने हातावर पोट भरणारे असल्याने शहरात जाणे जिकिरीचे असते व तेथील खाजगी डॉक्टर याचे चार्ज गरीबांच्या आवाक्या बाहेर असतात वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने केव्हा केव्हा मृत्युला पण सामोरे जावे लागते
तसेच महिलाचे डिलेवरीचा खुप गैरसोय होत आहे, आधी नगरपरिषद दवाखान्यात चोवीस तास डिलेवरी सेवा दिली जात होती.परतुं चार,पाच वर्षा पासून महिला डिलेवरी सेवा बंद झालेली आहे ,रात्री,बे-रात्री , महिलांना खाजगी दवाखान्यात जावे लागते. आजकाल तर डिलेवरीचे खाजगी दवाखान्याचे अवास्तव खर्च येत असतो.म्हणुन फैजपूर नगरपरिषद दवाखान्यात डिलेवरी सेवा पूर्ववत चोवीस तास सुरू करावी.सध्याचा दवाखाना नामात्र आहे.सदर दवाखान्यात त्वरीत डॉक्टर,व प्रशिक्षीत महिला नर्स व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात अशी मागणी निवेदनाव्दारे प्रांताधिकारी व मुख्याधिकारी नगरपालिका फैजपूर यांना केली आहे.
या मागणीची त्वरीत दखल घेण्यात यावी अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले असून निवेदनावर शाकिर खान शब्बीर खान व अशोकजी भालेराव अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय फैजपूर शहर, शे.शाकिर शे इमाम जिल्हा प्रवक्ता व समाजसेवक शे.कबीर शे कय्युम ,अजय मेंढे, इरफान ईस्माइल, सय्यद अर्शद सय्यद अजहर,फुरखान खान.सोईन मलीक आदींच्या सह्या आहेत,