आरोग्यरावेर

निंभोरा ४, खिर्डी बु. ३ व वाघोदा १ कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह !

निंभोरा (प्रतिनिधी)।  आज संशयित कोरोना तपासणी अहवाल निंभोरा सेंटरला आता प्राप्त झालेले असून अहवालांमध्ये ६ अहवाल तर रावेर येथे तपासणी केलेले २ अहवाल असे ८ अहवाल कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आज निंभोरा येथे कोविड तपासणी कॅम्प मध्ये स्थानिक प्रशासनाला प्राप्त झालेल्या निंभोरा गावांतील कोरोना तपासणी अहवालात निंभोरा येथील ४ अहवाल त्यात २ महिला व २ पुरुष बाधित आढळून आले आहेत. तसेच खिर्डी बुद्रुक येथील १ पुरुष व २ महिला व वाघोदा गावांतील १ पुरुषाचा अहवाल कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्याचे दिसत असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदरील वृत्तास वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन पाटील यांच्या कडुन दुजोरा मिळाला आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –

कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!