नियतीचा डाव…..,एकाच कुटुंबातील 10 दिवसात 5 सदस्याचा मृत्य….मनाला चटका लावणारी घटना……
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
सावदा (विशेष प्रतिनिधी)। गेल्या 15 ते 20 दिवसा पूर्वी एकाच कुटुंबातील 6 ते 7 व्यक्ती कोरोना पॉझिटिव आले होते. सावदा येथील माजी नगरसेवक कै.सतिशसिंग गणपतसिंग परदेशी यांचे एकत्रित कुटुंब असून या कुटुंबातील 6 ते 7 जण मागील 15 ते 20 दिवसात एकामागुन एक कोरोना पोजेटिव्ह आले यानंतर त्यांना उपचारार्थ जळगाव व मुक्ताईनगर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांचे वर तेथेच उपचार सुरु होते
दरम्यानच्या काळात प्रथम या कुटुंबातील किशोरसिंग परदेशी यांच्या पत्नी संगीता किशोरसिंग परदेशी, वय 45 यांची प्रकृती खलावली व त्यांचे 21 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 ला निधन झाले, सुनेच्या निधनाची माहिती समजताच दुःख सहन न झाल्याने त्यापाठोपाठ दुसऱ्या दिवशी दि 22 मार्च रोजी संध्याकाळी 7 वाजता परदेशी याच्या आई कुवरबाई गणपतसिंग परदेशी ,वय 90 यांचे घरीच वृद्धापकाळाने निधन झाले,दि,24 सोमवार रोजी संध्याकाळी 7 वाजता संगीताचे पती किशोर गणपतसिंग परदेशी,वय 53 यांचे देखील निधन झाले, सकाळी लहान भाऊ किशोर परदेशी यांचे निधनाची बातमी येत नाही तोच मुक्ताईनगर येथे रुग्णालयात दाखल असलेले त्यांचे मोठे भाऊ व पत्रकार कैलाससिंग गणपतसिंग परदेशी वय 55 यांचे दी,25 मार्च रोजी सकाळी 10 वाजता यांचे देखील निधन झाल्याने या परिवारावर एकच दुखा:चा डोंगर कोसळला,परदेशी परिवातील 4 जण 4 दिवसाचे आत निधन झाले, या दुःखातून सावरत नाही तोच त्याचेच मोठे बंधू रामसिंग (राजू )गणपतसिंग परदेशी, वय 59 याचे 31 मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात संध्याकाळी 9 वाजेच्या सुमारास निधन झाले ,दि,21 मार्च ते 31 मार्च आशा दहा दिवसांत परदेशी कुटुंबातील चार कोरोनाचे शिकार होऊन तर एक वृद्धापकाळाने, आशा पाच सदस्याचा मृत्यू झाल्याने परदेशी कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगरच कोसळला,
इंडियऩ एक्स्प्रेस या जागतिक वृत्तपत्रांन सुद्धा या अत्यंत दुःखद आणि धक्कादायक बातमी ची दखल घेतली. दहा दिवसात एकाच कुटुंबातले पाच मृत्यू झाल्यानं सार्या जळगाव जिल्हयाला धक्का बसला.एकाच घरातील पाच लोकांच्या मृत्यू ने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सुदधा दुःख व्यक्त केलं, सामनाचे कार्यकारी संपादक खा. संजय राऊत यांनी परदेशी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले असून 1990 पासून परदेशी सामनाचे पत्रकार होते, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम,देशमुख यांनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले असून राज्यातील सर्वच पत्रकारांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.परदेशी कुटुबाला सरकारनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी ही एस.एम.देशमुख यांनी केली आहे.
एकाच कुटुंबातील तीन भाऊ,व सून, असे चार व्यक्ती कोरोनाने व आई वृद्धापकाळाने,अशा पाच व्यक्ती 21 मार्च ते 31 मार्च या दहा दिवसांत मृत्युमुखी पडल्याने या दुःखद घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे कोरोनाच्या महामारीने एकाच घरातील पाच सदस्याच्या मृत्यूचे उदाहरण डोळ्यासमोर ठेऊन सर्व नागरिकांनी नियमाचे तंतोतंत पालन करावे, तोंडाला माक्स लावणे,सॅनिटायझर चा वापर करणे,गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे,सोशल डिस्टन्स पळणे, लसीकरण करून घेणे,कोरोना संसर्गाची वाढ होणार नाही याची दक्षता घेत कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.