भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंचनामे करण्यासाठी कृषी विभागाची टीम शेतक-यांच्या बांधावर दुबार पेरणीसाठी शेतक-यांना तत्काळ खते, बियाणे द्या.

मलकापूर (प्रतिनीधी) । बुलडाणा जिल्ह्यात दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोफत खते व बियाणे द्यावे, व ज्या कंपनीदाराने व विक्रेत्या़नी बोगस सोयाबिन बियाणे देउन शेतक-यांची फसवणुक केली त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी कृषी विभागा मार्फत सरकारकडे केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षीच्या खरीप हंगामाच्या पेरण्यांना जोरदार सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात खरीप पेरण्या मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. या वर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आर्थिक संकटावर मात करत बी बियाणे खरेदी केले. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाची उगवण झाली नाही. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे पीक उगवले नसल्याने सदरील शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे.

शिवाय शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. बनावटी बियाणे तयार करणाऱ्या आणि उगवण क्षमता यांची हमी देणाऱ्या कंपन्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रचंड शेतक-यानकडुन करण्यात आली होती. परंतु अद्यापपर्यंत सदरील कंपन्या आणि बियाणे विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणतीही कारवाई झाली नसल्याने प्रशांत डिक्कर यांनी कृषी विभागाची टीम थेट निरोड शिवारात शेतक-यांच्या बांधावर नेत पंचनामे करण्यात आले आहे. व कंपनीदार आणि बोगस बियाणे विक्रेत्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी कृषी विभागाकडे केली आहे. अशा परिस्थितीत आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने त्वरित मदतीचा हात देत दुबार पेरणीसाठी आवश्यक असणारे संपूर्ण खते आणि बियाणे मोफत पुरवठा करावा. दरम्यान कंपन्यांनी बनावटी बियाणे तयार केले अशा कंपनी मालकावर , व्यापाऱ्यांवर त्वरीत गुन्हे दाखल करावेत. त्यांच्या कंपनीचे परवाने रद्द करावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात असताना राज्य सरकार मात्र शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत करत नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात दुबार पेरणीचे संकट त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा मानसिकरीत्या खचत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज निरोड शिवारात तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, पं.स.कृषी अधिकारी सी.पी उंद्रे व कृषी विभागाचे कर्मचारी यांचे कडुन पंचनामे करण्यात आले. पंरतु अशा परिस्थितीत राज्य सरकारने विनाविलंब दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना तत्काळ मोफत खते आणि बियाणे उपलब्ध करावेत अशी मागणी या वेळी करण्यात आली. पंचनामा स्थळी रोशन देशमुख, प्रतिक गावंडे, शांताराम अवचार, अनूप देशमुख, उमेश सौदागर, मोहन अवचार, प्रतिक देशमुख,चंद्रकांत बोरसे, अमोल आगरकर, अमित देशमुख, सोनाजी कोठे, सह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!