पत्नीचा छळ व बियर पिण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल
जळगाव (प्रतिनिधी)। येथील विवाहित महिलेचा छळ केल्याप्रकरणी बळजबरी हुक्का पाजणे तसेच बिअर पिण्यासाठी दबाव टाकत प्रवृत्त केल्याने तसेच पैशांसाठी वेळोवेळी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ या धक्कादायक घटने प्रकरणी चार जणांविरुद्ध आज शुक्रवार रामानंद पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर असे की, पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार, विवाह जुळल्यापासून सासरच्या मंडळीकडून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. पारावर मानाचे ताटच्या ऐवजी १० हजाराची मागणी करण्यात आली. तसेच लग्नात मेकअपसाठी लागलेले २५ हजार रुपये देखील माहेरून आणण्यासाठी छळ करण्यात आला. लग्नानंतर हनिमूनसाठी सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर गेल्यावर पतीने बिअर पिण्यासाठी जबरदस्ती केली. एवढेच नव्हे तर बळजबरीने हुक्का पिण्यास भाग पाडले. यासंदर्भात पती भूषण दिनकर मोरे (वय ३४), सासू कमल दिनकर मोरे, सासरा दिनकर भास्कर मोरे आणि नणंद वृषाली जयेश कोरे सर्व रा. सिद्धार्थ नगर, लोंढे गेस्ट हाऊस मागे, नाशिक यांचेविरुद्ध भादवी कलम ४९८, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.