यावल

पन्नास पेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास हॉल चालकांवर गुन्हे दाखल करणार– चव्हाण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर (प्रतिनिधी)। जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत असे आदेश दिले असून या आदेशानुसार फैजपूर येथील मंगल कार्यालयात (हॉल )लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास सम्बधित मंगल कार्यालय चालकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे मुख्यधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले.

गेल्या तीन -चार महिन्याच्या विश्रांतीनंतर पुन्हा कोरोना संसर्गाने डोके वर काढल्याने प्रशासन हतबल झाले आहेत.रोज दिवसेंदिवस कोरोना रुग्णाच्या संख्येतभर पडत आहे यातच अंतयात्रा व लग्न समारंभात हजारो नागरिक एकत्र येऊ लागल्याने संसर्गाचा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे शासनाने पुन्हा एकदा लग्न समारंभ व अंत्यविधीमध्ये नियमावली जाहीर केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी असे आदेश काढले , सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे सॅनिटायझरचा वापर करणे हे बंधनकारक करण्यात आले असून मंगल कार्यालय चालकांनी लग्न समारंभ तारीख बुक करतांना फक्त ५० नागरिकांनाच परवानगी द्यावी. त्याच प्रमाणे फैजपूर शहरात सुद्धा कोरोना संसर्ग वाढू नये म्हणून पालिका प्रशासनाने खबरदारी घेत शहरातील सर्व मंगल कार्यालयाना आधीच नोटिसा बजावण्यात आलेले आहेत.

लग्नसमारंभात परवानगी देताना फक्त ५० नागरिकांनाच परवानगी देण्यात यावी अन्यथा मंगल कार्यालय चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी दिले। असून. ज्या ठिकाणी लग्न समारंभ असतील त्या ठिकाणी पालिकेचे पथक शहरात फिरणार आहेत ५० व्यक्ती पेक्षा जास्त नागरिक आढळल्यास त्यांच्यावर प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारण्यात येणार आहे व मंगल कार्यालय चालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असून ,कोणीही व्यक्तीने शासकीय नियमाचे पालन करावे अशी माहिती मुख्यधिकारी किशोर चव्हाण यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!