पिंपरुड शिवारात पुलाचे काम चालू असताना विजेचा शॉक लागुन डंफर चालकाचा मृत्यू !
पिंपरुड ता.यावल(प्रतिनिधी)। सावदा शहराजवळ असलेल्या पिंपरुळ गाव शिवारात पुल तयार करण्याचे काम चालू आहे. तेथील धाडी नदीवरील पुलाचे काम करत असताना तिथे भराव टाकण्या येत होता सदरील भराव डंफरच्या साहाय्याने डंफर खाली करत असताना विजेच्या खांबा वरील तारा वरून गेलेल्या होत्या सदरील तारातील वीज प्रवाह डंफर मध्ये उतरल्याने चालकाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. मृत व्यक्ती हतनूर येथील 40 वर्षीय सुरवाडे नामक व्यक्ती असून सदरील घटना घडतात गावातील नागरिकांनी गर्दी केली होती. पोलीस प्रशासन घटनास्थळावर पोहचले असून पंचनामा सह चौकशी चालू आहे.