पुरी गोलवाडे शिवारात गावठी हातभट्टी दारू उध्वस्त,निंभोरा पोलिसांची कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर(प्रतिनिधी)। रावेर तालुक्यतील निंभोरा पो स्टे हद्दीतील पुरी गोलवाडे गावाचे शेत शिवारात तापी नदीच्या बॅक वॉटर पात्रात गावठी हातभट्टीची दारू निंभोरा पोलिसांनी उध्वस्त करून करवाई केली.दारू गाळण्याचे साधनासह ,कच्चे रसायन तयार दारू एकूण 35,700/- रु .चे मुद्देमालासह आरोपी.राजू वसंत तायडे रा. गोलवाडे यांचेवर व रामा देवाजी तायडे रा.पुरी ता.रावेर याचेवर पो.स्टे गुन्हा रजिस्टर 0047/21व0048/21 महा. दारूबंदी अधिनियम क.65(फ)(ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून जिल्ह्यात आज सर्वत्र करोना चा संसर्ग वाढत असताना जिल्ह्यात कडक लॉक डाऊन सुरू आहे अशा परिस्थितीत पुरी गोलवाडे हे निंभोरा पोलिस स्टेशन हद्दीतील शिवारात अवैधरीत्या गावठी हातभट्टी दारू गाळण्याचे रसायन पोलिसांकडून नष्ट करण्यात आले ही कार्यवाही निंभोरा पो.स्टे स.पोनि.स्वप्नील उन्नवने यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय योगेश शिंदे, पो.हेकॉ राकेश वराडे पो.नाईक ईश्वर चव्हाण आदींनी ही कारवाई केली असून पुढील तपास पो. ना ईश्वर चव्हाण करीत आहे.