फैजपूर येथील सैनिक पत्नी हेमलता हेमचंद्र चौधरी याचे पती व सुनबाई च्या निधनाने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर .
मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।
फैजपूर (विशेष प्रतिनिधी )सैनिकांची आयुष्याची संसारवेल बहरण्याच्या महत्वाच्या टप्प्यावर देशसेवेसाठी स्वतः कौटुंबीक सौख्यापासून हजारो किलोमीटर दूर सियाचीन ग्लेशियर सारख्या मायनस 70 डिग्री तापमानात तर राजस्थान च्या भीषण उष्णतेत अगदी प्रतिकूल परिस्थितीत देशाच्या शत्रूशी सामना करीत असतात.एवढे समर्पण करून जेव्हा सौख्य उपभोगाचा काळ असतो तेव्हा नशीब साथ देत नाही.
या बाबत दुःखद घटना अशी की, फैजपूर येथील हनुमान नगरातील रहिवासी हेमचंद्र नामदेव चौधरी,माजी सैनिक यांचे 15 मार्च 2021 अचानक दुःखद निधन झाले.त्यांनी फाईव्ह मराठा इंफिटरी या बटालियन मध्ये नाईक म्हणून देशसेवेचे अमोल कार्य केले होते. ऑपरेशन ब्लु स्टार,सन 1984,सुवर्ण मंदिर अमृतसर या महत्वाचा ऑपरेशन मध्ये पण सहभागी होते.त्यांचे वय ६७ वर्षे होते.ते दीपक होले सर यांचे सासरे होते.
अजून काही दिवस होत नाही तसे त्यांच्या सुनबाई सौ स्मिता सचिन चौधरी हिचे दिनांक 6 एप्रिल 2021 अकाली निधन झाले.ह्या जि.प.शाळा कोचुर येथे उपक्रमशील शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या.
सौ स्मिता चे पती साचिन चौधरी हे सुद्धा आयुध निर्माणी वरणगाव येथे काम करुन देशसेवा करीत आहेत.
सैनिकांच्या संसारातरुपी वेलीचा जेव्हा वटवृक्ष होतो तेव्हा अचानक काळरुपी वादळ येऊन खूप मोठे नुकसान होते याचाच प्रत्यय या परिवाराला आलेला आहे.वार्धक्याच्या वेळी जेव्हा आरामाची गरज असते तेव्हा योशा व पारस ह्या छोट्या नातवंडाच्या सांभाळासाठी मयत माजी सैनिक हेमचंद्र चौधरी यांच्या पत्नी हेमलता हेमचंद्र चौधरीआजीला पुन्हा समर्थपणे घर सांभाळण्याची वेळ आली आहे.