यावल

फैजपूर वार्ता फाउंडेशन पत्रकार संघटनेच्या अध्यक्ष पदी उमाकांत पाटील तर उपाध्यक्ष पदी सलीम पिंजारी व मयूर मेढे

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

फैजपूर (प्रतिनिधी)। येथील वार्ता फाउंडेशन पत्रकार संघटनेची कार्यकारिणी ची सभा कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहात घेण्यात आली. यावेळी सर्वानुमते फैजपुर शहर अध्यक्षपदी प्रा. उमाकांत पाटील तर उपाध्यक्षपदी सलीम पिंजारी, मयूर मेढे यांची नियुक्ती करण्यात आली. माजी शहराध्यक्ष योगेश सोनवणे यांनी शहराध्यक्ष पदाचा पदभार प्रा. उमाकांत पाटील यांच्याकडे सोपवला.

या वर्षा साठी नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष प्रा. उमाकांत पाटील, उपाध्यक्ष सलीम पिंजारी, उपाध्यक्ष मयूर मेढे, सचिव संजय सराफ, सहसचिव प्रा. राजेंद्र तायडे, खजिनदार अरूण होले, कार्याध्यक्ष वासुदेव सरोदे, सदस्य सन्माननीय पत्रकार राजू तडवी, इदू पिंजारी, योगेश सोनवणे, शाकीर मलिक, जावेद काझी, कामिल शेख, निलेश पाटील या प्रमाणे असून यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सर्वांनी नूतन कार्यकारिणीचे स्वागत करून अभिनंदन केले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!