भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

रावेरसामाजिक

बऱ्हाणपूर-अंकलेश्वर रस्त्यावरील खड्डे बुजा; सा.बा.अधिकाऱ्यांच्या खुर्चीला शिवसेनेचे निवेदन !

सावदा प्रतिनिधी । बऱ्हाणपूर,अंकलेश्वर राज्य मार्गावरील सावदा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभाग सावदा कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर साईबाबा मंदिर,तसेच रावेर रोडवरील एलआयसी बिल्डींग समोर, बाबूशेट यांच्या पेट्रोलपंपा समोर हायवे रोडवर काही महिन्यापासून ठिकठिकाणी मोठ खड्डे पडलेले आहेत.

कित्येक महिन्यापासून स्थानिक लोकांकडून महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. परंतु याकडे दुर्लक्ष होत असल्याने आता शिवसेनेने रास्ता दुरुस्तीच्या मागणीसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना यासंदर्भात दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे कि, रात्री बाईक वरून जाणारे येणारे आपला जीव वाचवत खड्डयातून मार्ग काढत असतात. या महामार्गावर हाकेच्या अंतरावर सार्वजनिक बांधकाम कार्यालय सुप्दा आहे पण याकडे जाणीवपुर्क लक्ष दिले जात नाही या खड्ड्यात एखाद्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतः पाहणी करून त्वरीत. रास्ता दुरुस्ती करावी जिवीत हानी झाल्यास सर्वस्वी जबाबदार बांधकाम खाते राहील रस्ते दुरुस्ती न झाल्यास शिवसेना दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी या महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करेल याची नोंद घ्यावी. असा इशारा देण्यात आला आहे सदरचे निवेदन बांधकाम अधिकारी हजर नसल्याने त्यांच्या खुर्चीला निवेदन देण्यात आले. सदरील निवेदनावर शरद भारंबे, शिवसेना शहर प्रमुख मिलींद पाटील यांच्या सह माजी नगरसेवक धनंजय चौधरी, मा. नगरसेवक शामकांत पाटील, गौरव भेरावा आदिंच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रतीं आमदार चंद्रकांत पाटील, आमदार शिरीषदादा चौधरी , सावदा सहाय्यक पोलीस निरिक्षक यांना देण्यात आल्या आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!