बिहार निवडणुकीतील भाजपाच्या विजयानंतर मा.खा.स्व.कृषिमित्र हरिभाऊ जावळे यांच्या भालोद गावी जल्लोष
भालोद (प्रतिनिधी )। बिहार येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा व जेडीयू ला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे माजी खासदार व माजी आमदार असलेल्या कृषिमित्र स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या भालोद गावी फटाक्यांची आतिषबाजी करून प्रचंड जल्लोष करण्यात आला.
स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे व माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे दुःखद निधन झाल्यानंतर त्याच्या परिवाराचे सांत्वन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांच्यासमवेत माजी मंत्री गिरीशभाऊ महाजन माजी मंत्री जयकुमार रावल यांनी प्रत्यक्ष भालोद गावी येऊन जावळे परिवाराचे सांत्वन केले होते. व बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होती , तेथे भारतीय जनता पार्टी जेडीयू यांनी सत्ता संपादन केल्यामुळे स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या भालोद गावी त्यांचे सुपुत्र अमोल हरिभाऊ जावळे यांच्यासह मा. कृ.ऊ.बा सभापती नारायण बापू चौधरी, भालोद भाजपाध्यक्ष मिनल जावळे ,मुरलीधर इंगळे ‘माजी सरपंच अरुण चौधरी , भास्कर पिंपळे , नितीन चौधरी यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भालोद गावी प्रचंड जल्लोष केला पहिल्यांदाच भारतीय जनता पार्टीच्या विजयामध्ये स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे सुपुत्र अमोल हरिभाऊ जावळे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने रावेर- यावल तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे व उत्साहाचे वातावरण आहे कारण स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या मित्र परिवारामध्ये खूप नैराश्याचे वातावरण होते व आज रोजी भालोद गावी अमोल हरिभाऊ जावळे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतल्याने कार्यकर्त्यां मध्ये उत्साहाचं वातावरण असून हा चर्चेचा विषय बनला आहे.