भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

ब्रेक दि चेनचा पहिला बळी! सलून व्यवसायिकाची आत्महत्या

मंडे टू मंडे वृत्तसंकलन ।

उस्मानाबाद (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात ब्रेक दि चेन मोहीम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने मागील आठ दिवसांपासून प्रशासनाने सलून बंद ठेवण्याचे आदेश दिलेत. पण दुकान बंद झाल्याने उदरनिर्वाहाचे बिकट संकट निर्माण झाल्याने उस्मानाबाद तालुक्यातील सांजा येथील एका सलुन व्यावसायिकाने आपले जीवन संपवले आहे. मृत्युपूर्वी त्याने चिठ्ठी लिहून दुकान बंद झाल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले.

मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्यांनी लिहीले आहे की, माझ्या आत्महत्येला कोणालाही दोषी ठरवू नये. मी माझ्या जीवाला कंटाळून आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येमुळे माझ्या घरच्यांना त्रास देऊ नये. तसेच माझ्या घरच्या लोकांवर बायको, भावावर कोणतेही आरोप घेऊ नये ही माझी कळकळीची विनंती आहे. मी कोरोनाला आणि गरिबीला कंटाळून आत्महत्या करीत आहे. आमची दुकाने बंद आहेत, आम्ही पाच हजार रुपयांवर घर कसे चालवायचे असे देखील मनोज झेंडे यांनी चिठ्ठीत लिहिले आहे. मागील आठ दिवसापासून व्यवसाय बंद असल्याने उदनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने सांजा येथील तरुण व्यवसायिक मनोज झेंडे (वय ४०) यांनी शनिवारी रात्री विषारी औषध पिले. कुटुंबीयांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोप झेंडे यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज झेंडे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे.

मनोज झेंडे यांचे सांजा गावात छोटे केशकर्तनालय होते. यावरच ते आपल्या कुटूंबाची उपजिवीका करत असत. त्यांना ना शेती होती ना इतर कोणतेही उत्पन्नाचे साधन. मागील आठ दिवसापासून धंदा बंद असल्याने पैसा येणे बंद झाले. यातच हातऊसने घेतलेले पैसे, कर्ज, लाईट बील यासह इतर देणी असल्याने त्यांनी मनोज झेंडे यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!