भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी राजुमामा भोळे यांची निवड !
जळगाव (प्रतिनिधी)। भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी खासदार व आमदार हरीभाऊ जावळे यांची वर्षाच्या सुरवातीला भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली होती. त्यामुळे लेवा पाटील समाजाकडे नेतृत्व होते यानंतर हरीभाऊंचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे या पदावर नेमकी कुणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू होती. भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांची निवड करण्यात आल्याने पुन्हा लेवा पाटीदार समाजात समतोल राखण्याचा प्रयन्त केला गेल्याचे दिसते. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एका पत्रकाच्या माध्यमातून राजूमामा भोळे यांची जिल्हाध्यक्षपदी निवड जाहीर केली आहे.
जळगाव महानगराध्यक्ष म्हणून काम पाहिलेले आमदार राजूमामा भोळे यांना आता त्यांच्यावर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देखील आली आहे. या माध्यमातून भाजपने पुन्हा लेवा पाटीदार समाजाला या पदाची संधी दिल्याचेही स्पष्ट झाले आहे. हरीभाऊ जावळे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या भाजपच्या जिल्हाध्यक्षपदी जळगावचे आमदार राजूमामा भोळे यांची निवड करण्यात आली आहे.