भारताचं पहिलं सोशल मीडिया App झाले लाँच !
नवी दिल्ली: केंद्र सरकारने भारत-चीन वादाच्या पार्श्वभूमीवर चीनच्या ५९ Appवर बंदी घातल्यानंतर आता देशातील पहिले अधिकृत सोशल मीडिया App Elyments लाँच झाले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी Elyments हे नवीन सोशल मीडिया App लाँच केले आहे. देशातील जवळपास १ हजार पेक्षा अधिक आयटी तज्ज्ञांनी हे स्वदेशी App डेव्हलप केले आहे. विशेष म्हणजे हे सर्व तज्ज्ञ श्री श्री रविशंकर यांच्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेचे स्वयंसेवक आहेत, अशी माहिती नायडू यांनी यावेळी दिली आहे.
I am happy to note that more than one thousand IT professionals, who are also the volunteers of the Art of Living, have together created an indigenous app named Elyments. It’s appreciable that the app will be available in eight Indian languages. pic.twitter.com/306oUJ1lRy
— Vice President of India (@VPSecretariat) July 5, 2020
Elyments हे नवीन सोशल मीडिया App आठ भाषांमध्ये उपलब्ध असून हे App सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेल्या फेसबुक, इन्स्टाग्राम यासारख्या App ना टक्कर देणारे ठरण्याची शक्यता आहे. या App मध्ये ऑडियो-व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलिंग, मेसेजिंग आणि ग्रुप चॅटिंग, सोशल कनेक्टिव्हिटी, न्यूज अपडेट्स, Elyments Pay या फीचरद्वारे सुरक्षित ई-पेमेंट पर्याय आणि भारतीय ब्रँड्ससाठी ई-कॉमर्स यांसारखे फीचर्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
या App ची अनेक दिवसांपासून टेस्टिंग सुरु होती. आता हे App गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले असून आतापर्यंत एक लाखांहून जास्त जणांनी हे App डाउनलोडही केले आहे. त्याचप्रमाणे हे App डेव्हलप करताना युजर्सच्या प्रायव्हसीची विशेष काळजी घेण्यात आली असल्याची माहिती डेव्हलपर्सकडून देण्यात आली आहे.