भालोद :येथील महाविद्यालयास स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे नाव दया आजी माजी विद्यार्थ्यांची मागणी !
शब्बीर खान
हिंगोणा ता.यावल(प्रतिनिधी)। भालोद येथील से.ए .सोसायटी संचलीत कला व विज्ञान महाविद्यालयास स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचे नाव संस्थेने द्यावे ,अशी मागणी निवेदनाव्दारे महाविद्यालयाच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी केली आहे. तशा आशयाचे निवेदन संस्थेचे सचिव नितीन चौधरी यांना विद्यार्थ्यांनी दिले .या निवेदनात म्हटले आहे की ,भालोद परिसरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची संधी भालोद महाविद्याल्यामुळे मिळाली .
जून १९९६ ला हे महाविद्यालय सुरू करून त्याचा अप्लावधीत विकास करण्यात संस्थेचे चेअरमन व अध्यक्ष राहिलेले माजी खासदार व आमदार हरिभाऊ जावळे यांचे अतुलनीय योगदान राहिले आहे. ग्रामीण भागातील सर्व समाज घटकातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार संस्कारक्षम शिक्षण मिळावे यासाठी स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांनी महाविद्यालयात दर्जेदार सेवा व सुविधा निर्माण करून उच्च शिक्षण घेण्याची संधी या परिसरातील गोर-गरीब विद्यार्थ्यांना निर्माण करून दिलेली आहे. विद्यार्थ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व प्रेमाचे सबंध होते. विविध शैक्षणिक अडीअडचणी सोडविण्यासाठी ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत असत. आपल्या प्रेमळ व शान्त स्वभाव व स्वच्छ चारित्र्यामुळे ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. त्यांचे जीवन व कार्य विद्यार्थी व समाजाला प्रेरणा देणारे आहे . त्यांच्या विचार , संस्कार व कार्याची भावी पिढ्याना प्रेरणा मिळण्यासाठी आदर्श व्यक्तिमत्व राहिलेल्या संस्थेच्या अध्यक्षांचे त्यांचे नाव कला व विज्ञान महाविद्यालयास संस्थेने द्यावे ,अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.