भुसावळात अपघात; पती-पत्नी जागीच ठार
भुसावळ प्रतिनिधी । शहरातील खडका चौफुली येथे डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने आज सकाळी झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे.
आज सकळी ८.३० वाजता खडका चौफुली एमएच-१९ झेड ३१९२ क्रमांकाच्या डंपरने शहरातून जाणार्या खडका चौफुली येथे दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील चंद्रकांत जगन्नाथ वराडे आणि संध्या वराडे (वय) हे दोन्ही जण जागीच ठार झाले. हे दोन्ही जण बुलढाणा येथील रहिवासी असून ते विवाहासाठी भुसावळ येथे आले होते. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. यामुळे काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आली असून या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.