जुगाराचा डाव उधळला,भुसावळात बाजारपेठ पोलिसांची कारवाई !
भुसावळ प्रतिनिधी । शहरातील मंगळवारी पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी वाल्मीक नगर परिसरात सुरू असणार्या जुगारावर पोलिसांनी धाड टाकत सहा जणांना अटक केली आहे. वाल्मिक नगर भागात गब्बर चावरीया यांचे घराच्या मागील भागात असलेल्या मोकळ्या जागेत काही लोक जुगार खेळत असल्याची माहिती होता पोलीस निरीक्षक दिलीप भागवत त्यांनी निर्देश दिल्याने बाजारपेठ पोलीस स्थानकाच्या कर्मचार्यांनी या ठिकाणी छापा टाकत विकास वसंत वलकर (वय ३२), अजय दिपचंद बोयत (वय ३८), करण गोपाल ढोलपुरे (वय २५), हेमंत रमेश ढिक्याव (वय ३०), राहुल अशोक टाक (वय ३०) आणि आकाश रायसिंग पंडित (वय २४) सर्व राहणार वाल्मिक नगर भुसावळ हे जुगार खेळतांना आढळून आले. त्यांच्याकडे पत्ता जुगाराची साधने व रोख रक्कम ११३९० /- रुपये सह मिळुन आल्याने वरील सहा जणांवर विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम-१२(अ) प्रमाणे कार्यवाही करण्यात आली आहे. कार्यवाहीउपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड व पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो. निरीक्षक संदीप परदेशी पो.ना. रमण सुरळकर, पो.कॉ. विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी व होमगार्ड कर्मचारी आकाश सुरळकर यांच्या पथकाने केली आहे.